spot_img
spot_img
26.6 C
New York
Saturday, August 1, 2026

मच्छिंद्र मच्छुऑ सहकारी संस्थेचे अध्यक्षपदी दिलीप मांढरे तर उपाध्यक्ष शंकर कामतवार यांची अविरोध निवड

भद्रावती : सहाय्यक निबंध कार्यालय भद्रावती येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी मच्छिंद्र मच्छिंद्र सहकारी संस्था भद्रावती र. नं.784 सुनील पांडे यांचे अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या दिनांक 25 मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी दिलीप किसनराव मांढरे तर उपाध्यक्षपदी शंकर बंडूची कामतवार यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी शाल व पुष्पमाला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मच्छिंद्र मच्छुऑ सहकारी संस्थेच्या दि.14 मे रोजी पार पडलेल्या सन 2023 ते 2028 पर्यंतच्या संचालक पदाच्या निवडणुकीत श्री वाल्मिकी मत्स्यविकास सहकारी पॅनलने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) भद्रावती-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे कुशल नेतृत्वात, नगरसेवक नंदू पढाल व सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे यांचे मार्गदर्शनास 11 जागांपैकी 9 जागावर विजय प्राप्त करून दणदणीत विजय मिळविला. दि. 25 मे ला संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलीप किसनराव मांढरे यांची अध्यक्षपदी तर शंकर बंडूची कामतवार यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. यात विद्यमान संचालक सुरेश मांढरे, मधुकर पचारे, श्रीराम नागपुरे, सुधाकर , राजेंद्र बगळे, मंदा मांढरे, संगीता नागपुरे तसेच सुनील पारशिवे व संतोष नागपुरे या संचालकांचा समावेश होता.

ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील पांडे, सहा. निवडणूक अधिकारी शांताराम येवले व सचिव संभाजी मांढरे यांचे उपस्थितीत पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे सीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक तथा मार्गदर्शक रवींद्र शिंदे, नगरसेवक नंदू पढाल, स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, डॉ. नरेंद्र (नब्बु) दाते, गुरुजी फाउंडेशनचे संजय तोगट्टीवार, घनश्याम आस्वले, राजेश लांबट, गणेश कामतवार, गौरव नागपुरे, पवन मांढर, शुभम पचारे, श्रीराम रुयारकर, गोपाल नागपुरे, सुनील मांढरे, राकेश मांढरे, गोपाल मांढरे, नरेश नागपुरे, संजय पचारे, सूरज नागपुरे आदींनी अभिनंदन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!