शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
प्रसार माध्यम क्षेत्रातील एका मोठ्या व प्रतिष्ठित खासगी समूहाद्वारा शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला जातो. या वर्षी चार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी तथा विदर्भवादी ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांना इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात आला आहे. प्रथमत:च आयोजित करण्यात आलेला सदर कार्यक्रम दिनांक २८ मे ला दुबई येथील ग्रँड हयात हॉटेल मधे पार पडला. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे सोबत होत्या.
डॉ. अशोक जीवतोडे हे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या पूर्व विदर्भातील एकमेव सर्वात मोठ्या व जुन्या शिक्षण संस्थेचे मागील ३० वर्षांपासून सेक्रेटरी आहेत. तथा जनता शिक्षण महाविद्यालयाचे मागील १८ वर्षांपासून प्राचार्य आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शैक्षणिक प्रयोग करून संस्थेला यशस्वीरीत्या पुढे आणले आहे व संस्थेचा कारभार चोख सांभाळला आहे. सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले. विदर्भ विकास चळवळ तथा ओबीसी चळवळ यात सक्रिय भूमिका राबवून विदर्भ राज्याच्या व ओबीसी समाजाच्या उत्थानाकरीता ते झटत आहेत. विविध कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार यांचे माध्यमातून त्यांनी चळवळीला बळ देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना सदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
या पुरस्काराकरीता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






