
चंद्रपूर :- लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये ३० मे रोजी मंगळवारी पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. महाराष्ट्रातील काँग्रेसमधील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२८ मे) रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन वर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. (२९ मे) रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते . आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे दोन दिवसा आधीच त्यांचे वडील श्री नारायण धानोरकर यांचे निधन झाले . त्यावेळी प्रकृती अस्वस्थ त्यामुळे ते वडीलांच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. वडिलांच्या निधनानंतर दोन दिवसांनीच त्यांचे निधन झाल्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरलेली आहे. या पच्छात पत्नी आमदार प्रतीभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ, बराच मोठा आप्त परिवार आहे.






