महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे घेण्यात आलेल्या एसएससी प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल उद्या दिनांक २/६/२०२३ ला दुपारी एक वाजता जाहीर होणार, असे शिक्षण मंडळ पुणे चे सचिव श्री ओक यांनी कळविले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे एसएससी ची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च 23 पर्यंत घेण्यात आली . या परीक्षेचा निकाल दिनांक २/६/२३ रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे . विद्यार्थ्यांना व शाळांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून पाहता येणार आहे.
सीबीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळ पुणे चा निकाल केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना व पालकांना लागली होती. महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाद्वारे मार्च महिन्यात करण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे बोर्डाचा निकाल उशिरा लागणार की काय ? अशा प्रकारचा संभ्रम विद्यार्थी व पालकात होता. मात्र शिक्षकांनी आपले पेपर तपासणी चे कार्य पूर्ण करून उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे वेळेतच सबमिट केल्याने निकाल मात्र वेळेवर लागणार आहे .
उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळावरून पाहता येणार आहे. असे राज्य महाराष्ट्र राज्य माध्यमिकव उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव श्री ओक यांनी कळविले आहे.






