उत्तम निकालाची परंपरा कायम…
नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक बोर्ड परीक्षेच्या निकालात यशवंतराव शिंदे विद्यालय चीचोर्डी , भद्रावती ने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल दिला असून , शाळेचा निकाल ९०.३६% लागलेला आहे.
नुकताच दहावी बोर्ड परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. यात यशवंतराव शिंदे विद्यालय चीचोर्डी , भद्रावती चा निकाल उत्तम लागला असून , शाळेचा निकाल ९०.३६ % आहे. या परीक्षेत शाळेतून कुमारी साहेबा परविन हुसेन शेख हिने ८७.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कुमारी विभूती प्रवीण शेरेकर हिने ८४.२० % गुण घेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे . वेदांत अजय उताणे याने ८४% गुण घेत शाळेतून तिसऱ्या क्रमांकावर आला. यश किशोर सिर्सिया याने ८२.८०%.गुण घेत शाळेतून हा चौथा क्रमांक प्राप्त केला आहे, तर कुमारी सानिका दौलत उताणे तिने ८१.८०% गुण घेत शाळेतून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालयातून एकूण ८३ विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे. या निकालात प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० असून , प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २७ आहे . द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 33 आहेत. तर तृतीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशवंतराव शिंदे विद्यालय चीचोर्डी भद्रावती चा बोर्ड परीक्षेचा निकाल उत्तम असतो तसेच, क्रीडा क्षेत्रात सदैव उत्तम असतो. याही वर्षी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे ,सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ.विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, पर्यवेक्षक एम.एस. ताजणे, ए. एम. देशमुख , सतीश नंदनवार ,उमेश पाटील, सुहास कोल्हे, समस्त शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.






