spot_img
spot_img
29 C
New York
Saturday, June 6, 2026

नागपुरातील विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाची जागा परत घेऊ : एड. दादासाहेब वलथरे

भोई समाजाच्या जनजागृती यात्रेत प्रतिपादन

भद्रावती : नागपूर येथील झिरो माइल परिसरात असलेल्या विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाची इमारत आणि उर्वरित जागा आपल्या समाजातील काही जणांनी पैशाच्या लोभापाई मेट्रोच्या ठेकेदाराला विकल्याचा आरोप करून ही जागा आपल्याला परत मिळवायची आहे. त्याकरिता विदर्भातील भोई समाजांनी एकत्रित येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. असे विचार भारतीय भोई विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एड. दादासाहेब यांनी व्यक्त केले. ते भारतीय भोई विकास मंडळाच्या वतीने विदर्भस्तरीय भोई, ढीवर कहार, केवट आणि त्यातील जाती- जमातीच्या जनजागृती यात्रेत येथील श्रीसंत झिंगुजी महाराज मठात बोलत होते. ही यात्रा याठिकाणी १ मे गुरुवारला रात्रो ८ वाजता पोहोचली. या यात्रेत समाजाचे जेष्ठ नेते प्रकाश डायरे, दिलीप मेश्राम, नगरसेवक नंदू पढाल, मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे, भोई समाजाचे तालुकाध्यक्ष सुनील पारशिवे प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकत्र येणे काळाची गरज आहे. आपण असेच विखुरलेले राहिल्यास इतर समाज आपला हक्क हिरावून घेईल. राजकीय क्षेत्रात आरक्षण नसल्याने आपल्याला राजकारणात स्थान नाही. भोई समाजाचे प्रश्न मांडण्याकरिता हक्काचा नेता नाही. त्यामुळे आपला समाज मागे आहे. असे विचार समाजाचे ज्येष्ठ नेते प्रकाश डायरे यांनी यावेळी व्यक्त केले. यात दि.१२ मे २०२३ च्या शासन निर्णयाविरुद्ध जनजागृती, भोई- ढीवर सदृश्य नावाचा फायदा घेऊन बोगस जातीचे दाखले देण्याविरुद्ध जनजागृती, पेसा कायदा रद्द करावा, घरकुलाचे वाटप करावे, शिक्षणासाठी भोई जातींच्या मुला-मुलींकरता वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे. या प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. यावेळी मच्छीमार संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळाचा तसेच नवनियुक्त संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

संचालन व प्रास्ताविक मनोहर नागपुरे यांनी तर आभार दिलीप मांढरे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उमा नागपुरे, विद्या कामतवार, सविता दिघोरे, मंदा मांढरे, माला रुयारकर, सुभाष नागपुरे, दिलीप नागपूरे, प्रवीण नागपुरे,शुभम पचारे,शंकर नागपुरे, अनंता मांढरे, गौरव नागपुरे आदी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!