अमली पदार्थाचे सेवनाबद्दल जागरूक असणे प्रत्येकाचे कर्तव्य- न्यायाधीश जरूदे मॅडम
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे प्रहरी क्लब यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती व विधी प्राधिकरण भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत अमली पदार्थाचे सेवनाबद्दल जनजागृती व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
अमली पदार्थांचे सेवन जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती ए. एस. जरुदे मॅडम, दिवाणी न्यायाधीश भद्रावती, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती देवरे मॅडम न्यायाधीश भद्रावती , प्राचार्य डॉ सुधीर मोते, एडवोकेट मिलिंद रायपुरे, प्रा उज्वला वानखेडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी ,भद्रावती येथील प्रहरी क्लब व विधी सेवा प्राधिकरण, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश जरुदे मॅडम यांनी “विद्यार्थ्यांनी अमली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहावे व परिसरात अमली पदार्थाचे सेवन करणारे आढळल्यास त्यांना सुद्धा अमली पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त करावे” असे मार्गदर्शन केले. न्यायाधीश देवरे मॅडम यांनी “अमली पदार्थाच्या सेवनातून आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अमली पदार्थाची विक्री करणे, जवळ बाळगणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे” त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ॲडव्होकेट भालेराव, सर एडवोकेट ताठे, एडवोकेट चंदनखेडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नशा मुक्त भारत व कायदेविषयक मार्गदर्शन यावर भाष्य केले. अमली पदार्थाच्या सेवनाने अनेकांचे आयुष्य व कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, याचे अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. अमली पदार्थाचे सेवन केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होते व समाजावर त्याचे विपरीत परिणाम होतात. युवा पिढी भारताचे भवितव्य आहे, ती निरोगी व नशा मुक्त असावी. यासाठी “नशा मुक्त भारत अभियान” मार्फत ५ ते १२ जानेवारी पर्यंत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट स्नेहा खडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक चव्हाण सर, डोकं सर, जांभुळकर सर, चौधरी सर , सेवा प्राधिकरण विभागातील विधीज्ञ, कर्मचारी मंडळी व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील प्रहरी क्लबचे सर्व नियंत्रक मंडळ सदस्य, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






