spot_img
spot_img
21.8 C
New York
Thursday, July 30, 2026

बळवंत काॅलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन…

सांगली प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज विटा येथील राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागाच्या वतीने दिनांक ७ जानेवारी ते १३ जानेवारी विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. आर. बोबडे व कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप जाधव व प्रा. डॉ. प्रवीण बाबर यांनी सांगितले.

या शिबिराचे उद्घाटन खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सीआर बोबडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण रावतळे, उपसरपंच संजय रावताळे, सहाय्यक शिक्षण संचालक तथा समन्वयक डॉ. गणपती कमळकर, सहाय्यक शिक्षण निरीक्षक महेश सावंत, विभागीय समन्वय राजेंद्र कोळेकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपूर्ण होणार आहे. या शिबिरात सात दिवसात विविध प्रबोधन करूया ग्रामस्वच्छता पर्यावरण संवर्धन व रक्षण जलसाक्षरता व्यसन मुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन महिला सबलीकरण सेंद्रिय शेती आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती प्रा. दिलीप जाधव यांनी दिली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!