स्काय एज्युकेशन भद्रावती चा उपक्रम..
भद्रावती
भद्रावती येथील प्रथित यश स्काय एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सर तर प्रमुख अतिथी डॉ जयंत वानखेडे सर, माजी प्राचार्य व्यासपीठावर उपस्थित होते.
स्काय एज्युकेशन अकॅडमी भद्रावतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रित्यर्थ बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोपसमारंभाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ कार्तिक शिंदे यांनी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्काय एज्युकेशन अकॅडमी काम करत आहे. मागील वर्षी स्काय एज्युकेशन अकॅडमी मधील बारावीतील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्राविण्य प्राप्त केलेले आहे,” असे सांगितले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. जयंत वानखेडे यांनी “आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रमांची परकष्ट करावी सोबतच वेळेचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे” असे मार्गदर्शन केले.
स्काय एज्युकेशन अकॅडमी मधून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन तसेच नीट, जेईई ,सीईटी यासारख्या परीक्षांची उत्तम तयारी केली जाते, ही भद्रावतीसाठी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून आपल्या कलागुणांचा आविष्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भागवतकर तसेच मार्गदर्शक मंडळींनी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






