पुणे
दिनांक २७/ १२/ २०२५ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे कै. इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री अनिलकाका जोगळेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व उपप्राचार्य प्रा. पी. एस. लोढा, पर्यवेक्षक प्रा एस. ए. श्रीमंते, कार्यालयीन प्रबंधक सौ. एम. डी. कोरे, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. के. जी. नेटके, कला विभाग प्रमुख प्रा. आर. एस. कांबळे उपस्थित होते.
१९७७ पासून कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धा सुरू करण्यात आली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मा. अनिलकाका जोगळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यात या स्पर्धा तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय व्हाव्यात व त्यातून चांगले वक्ते तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून या वादविवाद व गटचर्चा स्पर्धेचे उद्घाटन केले.
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी यांनी या स्पर्धेमुळे महाविद्यालयात अनेक वक्ते तयार होतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री अनिलकाका जोगळेकर यांच्याकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेत भाग घेतला व कनिष्ठ महाविद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांनी गटचर्चा स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धक विद्यार्थ्यांना सिनिअर वकृत्व मंडळाच्या चेअरमन डॉ वंदना नढे व ज्युनिअर वक्तृत्व मंडळाच्या चेअरमन प्रा. एस. डी. सोनार तसेच वक्तृत्व मंडळातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वंदना नढे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. ऐ. टी. जराड यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.वाय. सी. गिरमे, प्रा. पी. एस. उतळे व प्रा. आर. बी. जोशी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. जी. एम. रोकडे , प्रा. आर. ए. मोरे व प्रा. एस. जी. भोर यांनी काम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिक्षा सुकाळे व आभार प्रा. एस. बी. गवळी यांनी मानले.






