भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे बालविवाह अधिनियम व पोस्को कायदा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी प्रियंका गेडाम, पीएसआय, भद्रावती, प्रिया कांबळे, प्रकल्प व्यवस्थापक, रुदय संस्था, चंद्रपूर, अक्षय गेडाम, कायदा सल्लागार, चंद्रपूर, रश्मी भोयर, क्षेत्रीय अधिकारी, रुदय संस्था चंद्रपूर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी बाल तस्करी, अवयव तस्करी, गुन्हेगारी या समाजविघातक प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी पीएसआय प्रियंका गेडाम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संबंधी मार्गदर्शन केले. तसेच उज्वल भविष्य घडविण्यासाठी आपण अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.
प्रिया कांबळे यांनी बालविवाह कायदा यासंबंधी जाणीव जागृती केली. बालविवाह मुक्त भारत अभियानाबद्दल माहिती दिली. तसेच आपल्या परिसरात कुठेही बालविवाह होताना दिसला तर तात्काळ त्याची कल्पना आपण पोलिसांना दिली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. अक्षय गेडाम यांनी पोस्को कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व चाईल्ड हेल्पलाइन नंबरवर तक्रार दाखल करण्यात यावी असेही सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी भोयर क्षेत्रीय अधिकारी, रुदय संस्था यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. माही ढोके हीने केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.






