भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण मत्ते सर, प्रमुख उपस्थिती सुमित टोंगे , खुशी आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
बालकांच्या ठिकाणी असलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी व मुलांमध्ये शौर्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे मार्गदर्शन प्रा. मत्ते सर यांनी केले. याप्रसंगी चित्रकला स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा वर्षा दोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बोकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






