भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर मोते तर प्रमुख पाहुणे प्रा राकेश आवारी, प्रा प्रवीण मत्ते सर व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय गणित दिन हा डॉक्टर श्रीनिवासा रामानुजन यांचा जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. व्यावहारिक ज्ञानात गणिताचे फार महत्त्व असल्याचे अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भीष्माचार्य बोरकुटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बोकडे यांनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हरिहर मोहरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






