spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

माजी विद्यार्थी मेळावा व सेवानिवृत्त शिक्षकांचे सत्कारोत्सव

२१ वर्षानंतर एकत्र आले वर्गमित्र…..

चंद्रपूर

लोकसेवा मंडळ द्वारा संचालित विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव येथे २००४-२००५ या शैक्षणिक सत्रामध्ये वर्ग १२ मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळावा व सेवानिवृत्त शिक्षकांचे सत्कार दि.२८/१२/२०२५ रविवारला सकाळी आयोजित केला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या गराटे मॅडम, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बंसोड सर(माजी. प्राचार्य), श्री. राऊत सर (माजी प्राचार्य), श्री. सेलोकर सर (से.नि.शि.), श्री. धारणे सर(माजी प्राचार्य), श्री. बि. डी. मोटघरे सर (स.शि), श्री. चावरे सर(स.शि), सौ. नक्षीने मॅडम(स.शि) व श्री. शेंडे सर (उ.मा.शि). हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

माजी विद्यार्थी पराग बन्सोड यांनी
‘ हा स्वागताचा सोहळा’ हे स्वागत गीत म्हटले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या आवडत्या शिक्षकांबद्दल, वर्गशिक्षकाबद्दल, शिक्षकांच्या शिकवण्याबद्दल शालेय जीवनातील आठवणी व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व, शिक्षकांची शिकवण, ही फार महत्त्वाची आहे, असे वक्तव्य केले. प्रत्येक विद्यार्थी हा त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहे आणि त्यांना आपल्या शिक्षकांचा व विद्यालयाचा अभिमान आहे, असे त्यांनी वक्तव्य केले .

श्री. चावरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच ही आठवण माझ्या जीवनात नेहमी राहील अस त्यांनी म्हटले. श्री बन्सोड सर यांनी ‘माजी विद्यार्थी मेळावा व सेवानिवृत्त शिक्षक सोहळा’ याच्यावर स्वरचित चारोळी म्हटली. श्री सेलोकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साह व प्रतिसाद बघून सुंदर लयबद्ध गीत म्हटले. तसेच मी आता सुद्धा कार्यशील आहे असे त्यांनी सांगितले. श्री राऊत सर यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर श्री.धारणे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वतः कार्यक्रम आयोजित करून आम्हाला बोलविले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले तसेच जुन्या गोड आठवणी विद्यार्थ्यांसमोर ताज्या केल्या. श्री. मोटघरे सर यांनी मी सुद्धा याच शाळेतील विद्यार्थी आहे आणि मला समोरील विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थी म्हणून कार्यक्रम घ्यायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. गराटे मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सर्वांचे अभिनंदन केले तसेच वर्ग ११ वी ला मराठी विषय शिकवतांच्या आठवणी सांगितल्या. माजी विद्यार्थ्यांनी अशेच कार्यक्रम घेत राहिले पाहिजे, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला नेहमी तत्पर आहोत, असे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन श्री. योगेश मुंघाटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रुपाली ढोक यांनी केले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल २१ वर्षानंतर पुन्हा शालेय जीवनात आल्याचा, गतकाळातील अनुभूतींचा आनंद त्यांनी अनुभवला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!