भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारासंचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तथा माजी प्राचार्य, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रा. चंद्रशेखर जुमडे, प्रा. सौ. उज्वला वानखेडे, श्री आत्माराम देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आनंद मेळा हा आपल्या कलागुणांना, पाककलेला व कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे. याचा मनमुराद आनंद लुटावा व वर्षभर आपल्या जीवनात असाच आनंद कायम राहो” अशा शुभेच्छा डॉ जयंत वानखेडे यांनी दिल्या. नवीन वर्षात नवे संकल्प करावे व संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असाही संदेश दिला. नूतन वर्षाच्या व आनंदमेळ्याच्या निमित्ताने यावेळी आरोग्य तपासणी, बीएमआय तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. आनंद मेळया निमित्त विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. यातुन त्यांना पाककलेचे ज्ञान, व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले व व्यवहार कौशल्य विकसित झाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीच्या सदस्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हरिहर मोहरकर, भिष्माचार्य बोरकुटे, प्रेमा पोटदुखे, वर्षा दोडके, प्रणिता बोकडे, सतीश नंदनवार, रमेश चव्हाण, राहुल भगत, प्रतिक नागपूरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.






