spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

पो.स्टे. शेगाव हद्दीत गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

दोघांना अटक तर एकाच शोध सुरु

दि. 05/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत भिवकुंड येथे नाकाबंदी करून पिकअप वाहन क्र. MH-49 BZ-1769 ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्या मध्ये अवैध रित्या गोवंश ( बैल ) वाहतूक करताना आढळून आले.

पोलिसांनी 1) महेश सुर्यभान लोंढे (वय 38, चालक) रा. गोरेवाडा, नागपुर
2) राहुल अरुण वानखेडे (वय 23) रा. हिंगणा,नागपुर यांना ताब्यात घेऊन पिकअप वाहनासह 6 नग गोवंश (बैल) ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जि. चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.

आरोपीविरुद्ध पो. स्टे. शेगाव अप. क्र. 07/2026 कलम 11(1)(घ)(ड)भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ. 1960 r/w 5(अ), 9, 11 म.प्रा.सं.अ. 1976 (सुधारित 2015) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान यातील एक आरोपी सचिन वैद्य रा.कोंढा ता.नागभीड जि.चंद्रपुर हा अजून पोलिसांच्या हातात लागलेला नसून त्याचा शोध घेणे सुरु आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत
पिकअप वाहन व गोवंश – अंदाजे किंमत 7,20,000/-रु सदर दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पो.स्टे. शेगाव येथील कर्मचारी करीत आहे.

ही संपूर्ण कारवाई
सफौ धनराज करकाडे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकर, प्रमोद कोटनाके, पो अ अमोल सावे चापोहवा गजानन मडावी चिमुर उपविभाग स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!