तीन दिवसीय कार्यक्रम व आरोग्य तपासणी आणि रकदान शिबिराचे आयोजन
शेगाव बु येथे महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच शेगांव ( बु). यांचे तर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तीन दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ज्या मध्ये १ जानेवारी ला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम.२ जानेवारी सायंकाळी सप्त खंजरी वादक प्रदीप पाल चौधरी यांचे जाहीर प्रबोधनात्मक कीर्तनाच्या कार्यक्रम घेण्यात आला व 3 जानेवारी सकाळी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या नंतर दुपारी दोन वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु यांच्या चमू तर्फे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांना बोलावण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता. महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष सचिन फुलकर, अरविंद लाजेकर , प्रफुल वाढई, शुभम सहारे, शंकर फुलकर, गजानन शेंडे, सचिन रासेकर व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच सर्व सदस्य यांनी योगदान दिले.






