निवडणुकीच्या वेळेला विकास कामावर वोट मागणारे लोकप्रतिनिधी यांना जनतेच्या समस्या दिसणार कधी?
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता शिक्षणासाठी मुख्य गाव असून याठिकाणी मागील चार महिन्यापासून बंद असलेली हिंगणघाट बस पूर्ववत सुरू करा अथवा पर्यायी व्यवस्था करा विद्यार्थ्यांची संबंधित प्रशासनाला मागणी केलेली आहे.
वरोरा तालुक्यातील वडगाव, आब, साखरा, वडधा, उमरी, चारगाव खु, ते शेगाव तसेच या रोडवर येणाऱ्या आजूबाजूचे वीस ते पंचवीस खेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शेगाव येथे येत असुन सकाळी गावावरून शेगावला आल्यानंतर शाळा सुटल्यानंतर सायंकाळी परत जाण्यासाठी या मार्गावर एकमेव वरोरा, शेगाव,वडगाव ही एकच बस असते व तीही सायंकाळी सहा वाजता असून नियमित वेळेवर येईलच असे नाही. त्यामुळे सायंकाळी साडेचार ते पाच वाजता शाळा सुटल्यानंतर या रूटवरील विद्यार्थ्यांना वडगाव बस चि वाट बघत राहावी लागते. सन 2025 ते 2026 चे शालेय सत्र सुरू होण्याआधी या रूटवर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिवाहन विभागाची हिंगणघाट नंदोरी, कोरा, आब, वडगाव, शेगाव ही बस नियमित सकाळ व सायंकाळी यायची परंतु मागील चार महिन्यापासून या बसची फेरी बंद करण्यात आल्यामुळे एकमेव वडगाव या बसवर संपूर्ण विद्यार्थ्यां शिक्षणासाठी प्रवास सुरू असून त्यातही दर सोमवारी ग्रामीण भागातील नागरिक बाजाराला येत असल्यामुळे कित्येक वेळा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागामिळत नाही,
त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री हालटिंग बसची वाट बघावी लागते. बस ही प्रत्येक खेडोपाडी जात नसल्याकारणाने दिलेल्या टप्प्यावरून विद्यार्थ्यांना पायी गावी जावे लागते व परिसरात वाघाची भीती असल्याकारणाने विद्यार्थ्यां सुरक्षित्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
एकीकडे निवडणुकीचे वारे सुरू असताना लोकप्रतिनिधी हे विकासावर वोट मागताना दिसून येतात परंतु त्याच लोकप्रतिनिधी चे ग्रामीण भागातील सुविधांकडे कुठेतरी दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवड निवडणुकी पुरते लोकांकडे लोकप्रतिनिधी यांनी वोट बँक म्हणून न पाहता त्यांच्या सुविधेकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे व लोकप्रतिनिधी यांनी वडगाव ते खापरी हे दोन किलोमीटर अत्यंत दुरावस्था झालेळी असलेल्या रस्त्याकडे लक्ष देऊन तो लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जनतेने केलेली आहे.
या संदर्भात हिंगणघाट बस स्थानकचे व्यवस्थापक शेडमाके यांच्याशी फोन द्वारे विचारणा केली असता वडगाव ते खापरी हा रस्ता अत्यंत खराब असुन ठिकठिकाणी मोठे गड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मोठमोठे झाडे यामुळे बस येऊ शकत नाहीअसे त्यांनी सांगितले, स्थानिक प्रतिनिधींनी,गावातील प्रतिनिधी यांनी रस्त्याची झाडे तोडून व पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये माती, मुरूम भरून व्यवस्था करून द्यावी आम्ही उद्याच बस सुरू करतो असे त्यांनी सांगितले…






