विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा..
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिष्यवृत्ती भद्रावती येथे आदिवासी जनजाती गौरव दिन पंधरवडा मोठ्या थाटात संपन्न झाला.
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये आदिवासी जनजाती पंधरवडा सप्ताहाचे आयोजन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे करण्यात आले.
क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती प्रित्यर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी सौ उज्वला वानखेडे, प्रा. किशोर ढोक, डॉ. प्रशांत पाठक हे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. इंग्रज सरकारच्या विरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला व भारतीय समाज संघटित केले असे मार्गदर्शन केले.
आदिवासी जण जाती गौरव दिना प्रित्यर्थ विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने परिसंवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा तसेच आदिवासी भोज सहभोजन कार्यक्रम घेण्यात आले. आदिवासी वस्तीत भेट देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती ने पुढाकार घेतला. प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, भीष्माचार्य बोरकुटे, हरिहर मोहरकर, प्रेमा पोटदुखे, वर्षा दोडके, प्रणिता बोकडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.






