चंद्रपूर
फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर आणि पंचायत समिती बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कन्नाके सर यांच्या “मला काही बोलायचे आहे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजे खांडक्या बल्लाळ शाह सभागृह, बल्लारपूर येथे थाटामाटात नुकतेच पार पडले. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय धनंजय साळवे साहेब, समाजकल्याण अधिकारी चंद्रपूर, उदघाटक माननीय डॉ रामदास आत्राम कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ महू ( म. प्र)., प्रमुख अतिथी माननीय किशोर जामदार सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रंगकर्मी माननीय प्रवीण आडेकर सामाजिक कार्यकर्ते , डॉ. सौ. शारदा टेकाम वैधकीय अधिकारी चंद्रपूर व सामाजिक कार्यकर्त्या, राजेश मडावी उपसंपादक लोकमत, अविनाश पोइनकर, युवा कवी, आदिवासी विचारवंत, सुधाकर कन्नाके आणि सौ सीमा कन्नाके मंचावर उपस्थित होते.
सभागृहातील रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत मंचावर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी पुस्तकावर भाष्य केले. माननीय नरेश कुमार बोरीकर सरांनी प्रभावी सूत्रसंचालन केले आणि रसिकांची मने जिंकली. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन सौ सीमा सुधाकर कन्नाके यांनी केले.
पुस्तक प्रकाशनानंतर निमंत्रिताचे कवी संमेलन झाले. कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्रा. राजेश देवळकर सर कवी आणि सुप्रसिद्ध गझलाकार तर प्रमुख अतिथी माननीय प्रब्रम्हानंद मडावी सामाजिक कार्यकर्ता आदिवासी समाजाचे जानकार, साहित्यिक , कवी संमेलनाचे सूत्रसंचालक माननीय गोपाल शिरपूरकर सर मंचावर उपस्थित होते. सर्वश्री सन्माननीय कवी सुनील पोटे, प्रशांत भंडारे, अरुण झगडकर, संतोष कुमार उईके, मीना बंडावर, गीता रायपुरे, अर्जुमन बानो शेख, अरुण झगडकर, संगीता बांबोळे, आरती रोडे, शितल धर्मपुरिवार , डॉक्टर किशोर कवठे, शेष देवरमले, मनीषा मडावी, प्रीती जगताप, प्रदीप देशमुख, प्रशांत गोखरे डॉक्टर सौ शारदा टेकाम इत्यादी कवींनी आपल्या बहारदार दर्जेदार रचना सादर करून रसिकांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला उत्तुंग शिखरावर नेले. माननीय गोपाल शिरपूरकर सर यांनी त्यांच्या सुंदर शैलीत बहारदार सूत्रसंचालन केले. सर्व सन्माननीय कवींचा सन्मान करण्यात आला, तसेच चंद्रपूर मधील अनेक साहित्य संस्थेद्वारे माननीय सुधाकर कन्नाके यांचा सत्कार करण्यात आला.
तदनंतर सुधाकर कन्नाके यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गोंडी गीतावर झालेले सामूहिक नृत्य सर्वांना आनंद देऊन गेले आणि वातावरणात जल्लोष भरला. माननीय धनंजय साळवे साहेब यांचे उत्तम आयोजन, नियोजन आणि सर्वांचे सहकार्य त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. फिनिक्स साहित्य मंचच्या वतीने धर्मेंद्र कन्नाके यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाकरिता पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी, विजय वाटेकर सर, बी सी नगराळे सर, सुरेंद्र इंगळे सर इत्यादी फिनिक्स साहित्य मंचच्या मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.






