भद्रावती/प्रतिनिधी
भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सत्र २०२३-२४ मधील विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण तथा महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ एप्रिल २०२५ रोज गुरुवारला सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान असतील. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे राहणार आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे तथा आय.एस.बी. बेहरिन रिटर्न सेवानिवृत्त प्रा. धनराज आस्वले यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित राहतील. विवेकानंद महाविद्यालयातील श्री. अरविंद सभागृहात होणाऱ्या या समारंभास महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले आहे. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहे.






