spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

ग्रामसेवकाने केला ग्रामपंचायत फंडातून ३५ लाख रुपयांचा अपहार

आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केल्या जाईल -डॉ.आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी

भद्रावती : तालुक्यातील मांगली (रै.) ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने आपल्या कार्यकाळात विविध योजने मधुन ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करून या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकारी त्याला वाचविण्याचा सर्वपरी प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही प्रशांत काळे आणि ग्रामस्थांनी केला.

विभागीय आयुक्तांना भेटून या प्रकरणात १५ दिवसात अपहार करणारे ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश द्यावे. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू. त्यात आरोपींना सहकार्य करणारे विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि चौकशी अधिकारी यांचे विरुद्ध प्रकरण चालवू असे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामसेवक रायपुरे यांनी सन २०२२- २३ आणि २०२३-२४ व्या आर्थिक वर्षात मांगली ( रै. ) या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना गृहकर, सामान्य पाणी कर, विशेष पाणी कर, पंधरावा वित्त आयोग, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम यातून जमा झालेल्या रकमेतून आर्थिक अपहार करून ३५ लाख ४ हजार ३९२ रुपयांचा अपहार केला. विविध माध्यमातून जमा झालेल्या या रकमेची कॅश बुक मध्ये नोंद न करता आणि ते पैसे बँकेत जमा न करता परस्पर लंपास केल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार ग्रामपंचायत सदस्य घनश्याम उताणे यांनी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार चौकशी झाली असता प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. नंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण विभागीय आयुक्ताकडे पाठवणार आले. प्रकरण गेल्या १४ महिन्यापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे. केवळ सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले. परंतू नियमानुसार ९० दिवसाचे निलंबनानंतर त्याला परत मूल पंचायत समितीचे मध्ये कार्यभार देण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपहार केल्यानंतर सुद्धा त्याचे विरोधात पोलिसात तक्रार दिल्या जात नसल्याने यात इतर अधिकाऱ्यांचे सुद्धा हात गुंतले आहे आणि त्यामुळे ते आपला बचाव करण्याकरिता प्रकरण थंडाबस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील वर्षीच्या आमसभेत गटविकास अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल करू असे सांगितले. आज त्याला एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु प्रकरण त्याच स्थितीत आहे. या प्रकरणावर विभागीय आयुक्त यांनी १५ दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असे शेवटी परिषदेत सांगितले.

यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत काळे, सदस्य तथा माजी सरपंच घनश्याम उताने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील तेलंग, सदस्य नंदा पिंपळकर, माजी सरपंच मारुती सलाम, हरिदास लांबट व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मांगली रै. येथील ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचे विरोधात ज्या आर्थिक अपहारचे प्रकरन सुरू आहे. त्यात आमचे चौकशीत ग्रामसेवक दोषी आढळले. त्यासंदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरण पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरच पोलिसात तक्रार दाखल केल्या जाईल.” डॉ.आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती, भद्रावती.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!