spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ आंबेडकर जयंती साजरी

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे क्रांतिसूर्य, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. १९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपण घ्यावा, असे प्रतिपादन केले. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, या तत्वावर आधारित राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न , बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर प्रत्यक्षात सर्वांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, व समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी ते जगले, त्यांच्या वैविध्य पूर्ण कार्याचा व सामाजिक योगदानवार प्रकाश टाकून विविध उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन जेष्ठ विधीज्ञ एडव्होकेट भुपेंद्र रायपूरे यांनी केले.

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान दिपस्तंभासारखे दिशादर्शक असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केले. या प्रसंगी आत्माराम देशमुख, डॉ ज्ञानेश हटवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरूवात महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. या प्रसंगी असंख्य विद्यार्थांसह शिक्षक , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!