चिमूर : १३ एप्रिल २०२५
✍️ किशोर आष्टनकर
तालुका प्रतिनिधीधी
चिमूर : चिमूर तालुक्यातील आंबेनेरी येथे उन्हाळ्याच्या दिवसात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत पिण्याचे पाणी आणावे लागत असतात त्यामूळे सकाळी अंदाजे ९ वाजताच्या दरम्यान डोक्यावर गुंड घेऊन हॅन्ड पंप वर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेला भिसी जांभूळघाट मार्गावरील आंबेनेरी येथे क्रेनने चिरडले.
मृतक महिलेचे नाव शारदा मधुकर डांगे असुन त्यांचे वय ५८ वर्षे राहणार आंबेनेरी व्यवसाय मजुरी आहे.
सकाळची वेळ असल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली असून गोसेखुर्द च्या कालव्याच्या नहराच्या कामावरील हि क्रेन असल्याचे सांगितले जात आहे.
घडलेल्या घटने विषयी रोष व्यक्त करत नागरिकांनी महिंद्रा बोलेरो पिकअप कॅम्पर या वाहणाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पलटी मारून आंदोलन केले असता तब्बल ४ तास महिलेचे शव घटनास्थळावरून न हलवीता तनावाची परिस्थिती कायम ठेवली तर दुपारी ०१:०० वाजताच्या दरम्यान शव विच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक महिलेच्या कुटुंबात एक मुलगी व दोन मुले, पती असा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांतर्फे सुरु आहे.






