गावातीलच काही पदाधिकारी करतात अवैध धंदे..
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व भद्रावती तालुक्यातील आष्टा या गावामध्ये सद्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात मग अवैध मुरूम असो वा आष्टा नदीमधील वाळू असो. सगळ काही दिवसाढवळ्या खुले आम राजरोस पणे सुरु आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे या रेती चोरांना रातोरात लाखोपती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुगीचे दिवस आलेले आहे.

त्यातच याच्यावर कारवाही थातुर्मातूर होत असल्या कारणांनी यांना भीती कशाचीस उरलेली नाही. अशातच भर दिवसाढवळ्या रेती व मुरूमाचे उत्खनन सुरु आहे. सध्या रेती व मुरूम हे चढ्या भावाने विकल्या जात असल्या कारणांनी झटपट लाखोपती होण्याची जणू या तस्करामध्ये स्पर्धाच सुरु झाली आहे. नवनवीन तस्कर आता या अवैध धंदे मध्ये उतरायला लागले आहे. यात काही पदाधिकारी सुद्धा हे काम करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे…

एकीकडे काही प्रमाणात छोटी कारवाही करून दुसरीकडे जर भर दिवसा अशा प्रकारे रेती व मुरूमाची तस्करी सुरु असेल तर या प्रशासनाची, महसूल विभागाची व पोलीस प्रशासनाची काही भीतीच उरलेली नाही का? यातीला काही अधिकाऱ्यांशी यांची हातमिळवणी तर झाली तर नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न मात्र नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे..
चौकट:-
विशेष म्हणेज या तस्करी करणाऱ्या एकही ट्रॅक्टर मुंडी व ट्राली वर नंबर टाकलेले नसतात तरी पण पोलीस प्रशासन व परिवहन विभाग मात्र कारवाही का करत नाही हे मात्र विशेष..






