spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी माजी प्राचार्य, विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे , प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. १९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक, महाराष्ट्रात शिक्षणाची मुख्यतः स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श आपण घ्यावा असे प्रतिपादन केले. तसेच महिलांनाही पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार आहे असं केवळ ज्योतिराव फुले बोलून थांबले नाहीत. तर प्रत्यक्षात तसा अधिकार महिलांना मिळावा म्हणून त्यांनी आयुष्य वेचलं. शिक्षणाचा राजमार्ग खुला करून दिला असे मोलाचे मार्गदर्शन भद्रावती शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे यांनी केले.

महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान दिपस्तंभासारखे दिशादर्शक असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केले.

कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरिहर मोहरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राकेश आवारी यांनी केले. डॉ ज्ञानेश हटवार, डॉ प्रशांत पाठक, कमलाकर हवाईकर तसेच असंख्य विद्यार्थांसह शिक्षक , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!