भद्रावती
डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना १९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक, महाराष्ट्रात शिक्षणाची मुख्यतः स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
महिलांनाही पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार आहे असं केवळ ज्योतिराव फुले बोलून थांबले नाहीत. तर प्रत्यक्षात तसा अधिकार महिलांना मिळावा म्हणून त्यांनी आयुष्य वेचलं. शिक्षणाचा राजमार्ग खुला करून दिला असे मोलाचे मार्गदर्शन भद्रावती शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या विचारातून पोचविले. महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान अनमोल असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मार्गदर्शन डॉ. प्रशांत पाठक यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली असून यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. साक्षी दाते हिने केले. कार्यक्रमाचे आभार कु. करीना मेश्राम या विद्यार्थिनीने केले. या प्रसंगी असंख्य विद्यार्थांसह महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. प्रज्ञा लांडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख), प्रा. नेहा मानकर (राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक), प्रा. प्रिती कांदिकट्टीवार तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सीमा हवेलीकर व पुनम काळे उपस्थितीत होते.






