मुंबई : ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी दि. १० ते १४ एप्रिल २०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध नसेल, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) द्वारे कळविण्यात आले आहे.

या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्रचालक, ‘सेतू’ केंद्रचालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घेण्यात यावी.






