अन्यथा शेतकरी यांना करा लागेल आंदोलन
वरोरा
तालुक्यातील शेतकरी यांनी विविध समस्या बाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आमची फसवकून केली आहे अशी केली तक्रार वरोरा पुलिस स्टेशन मध्ये दाखल केली, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी निवडणुकी पूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली आहे तसेच डिमांड भरलेल्या शेतकरी यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्या पर्यंत विज जोडणी करायची असते मात्र पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विज मिळत नसल्याने शेतकरी यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांना वरोरा येथील तहसीलदार योगेश कौटकर यांच्या मार्फत शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा वरोरा येथील नागपूर चंद्रपूर महामार्ग रास्तारोको आंदोलन दि. १०/३/२०२५ ला केल्या जाईल व याला जबाबदार प्रशासन राहील असे शेतकरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना, अक्षय बोंदुलवार, विशाल देठे श्रीकृष्ण देवतळे, माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर, यादी शेतकरी निवेदन देताना हजर होते.






