spot_img
spot_img
7.3 C
New York
Sunday, November 29, 2026

भिसी येथे विविध संस्थाच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. ……… टायगर ग्रुप शाखा भिसी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

्

बजरंग दल शाखा भिसी यांच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्राचे आयोजन

चिमूर प्रतिनिधी. किशोर आष्टनकर


दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवार ला भिसी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती भिसी यांच्या वतीने बाजार चौकातील व्यासपीठावर महेश मैंद प्रस्तुत स्वर सुमनांजलीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर शिवगीत गाऊन उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला.

तसेच बजरंग दल शाखा भिसी यांचे वतीने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. टायगर ग्रुप शाखा भिसी यांचे तर्फे शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मां. जितेंद्र चांदे साहेब , डॉ. चंदन बावनकुळे प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी, सौ. ममता ताई डुकरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा महिला आघाडी प्रमुख, सचिनभाऊ गाडीवार , घनश्यामभाऊ डुकरे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे हे प्रामुख्याने उपस्थीत होते . टायगर ग्रुप भिसी तर्फे आयोजित विविध स्पर्धा मध्ये ऑनलाइन शिवकालीन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचां मानकरी गौरव सुरेन्द्र मेश्राम, द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुं. वैभवी नंदू सतीबावणे, तर तृतीय क्रमांकाची मानकरी कु. स्वरा श्याम येरूनकर ही ठरली. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००१ रू. रोख व पुष्गुच्छ ७७७ रूपये रोख व पुष्गुच्छ तसेच ५५५ रू. रोख व पुष्गुच्छ देऊन मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले.

मागील पाच वर्षांपासून शिवजयंती उत्सव निमित्त टायगर ग्रुप तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हि परंपरा कायम ठेवून यावर्षी सुध्दा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावर्षी या रक्तदान शिबिरात डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी ५१ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आणि रक्तदात्याना कॉलेज बॅग व पाणी बाॅटल भेट देत रक्तदात्याचे अभिनंदन केले. तसेच या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर व टायगर ग्रुप शाखा भिशीचे सर्व सदस्य भिसीच्या पदाधिकारी, सदस्य, सहकारी सदस्य तसेच हितचिंतक यांनी अथक परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा भद्रा भिशी नगरी दणावून निघाली. यात भिसी नगरवासीयांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!