spot_img
spot_img
21.8 C
New York
Thursday, July 30, 2026

के. सी. सी. कंपनीच्या निष्कर्षीमुळे एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

वारंवार अपघात होऊन सुद्धा कंपनी चे सुरक्षे कडे डोळेझाक

शेवट शेगाव पोलीस यांनी लावले मातीच्या ढिगाऱ्या भोवती ब्यारिगेट

तालुक्यातील वरोरा ते चिमूर ३५३ ई राज्य मार्गाचे अनेक वर्षा पासून काम सुरू असून अजून पर्यंत काम परिपूर्ण झाले नसल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. वरोरा ते चिमुर महामार्गचे काम सद्या के. सी. सी. कंपनीकडुन सुरू असुन दि. ९ फेब्रुवारी २०२५ रविवार रात्रोला सातच्या दरम्यान चारगाव धरणाजवळ मातीच्या ढिगरावरून दुचाकी वाहन गेल्याने चंदनखेडा येथील बाबा महादेव ठावरी अंदाजे वय वर्षे ६० यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर नथू कु़डलिक साळवे, रा.काटवल भगत हे जखमी झाले होते…
सविस्तर वृत्त असे कि गाडी क्र. एम. एच. ३४ सी. ई. १३७७ या दुचाकी वाहनाने बाबा ठावरी हे नातेवाईकातील तेरवीच्या कार्यक्रमाला गेले होते. सायंकाळी कार्यक्रम आटोपून चंदनखेडा या आपल्या गावाकडे परत येताना चारगाव धरण स्त्यावर मातीच्या ढिगार्‍यावर दुचाकी वाहन गेल्याने जागेवर पडून मृत्यू झालेला होता. के. सी. सी. कंपनीने मातीचे ढिगारे रस्त्यावर ठेवल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांना रात्रीच्या सुमारास दुचाकी चालवताना त्रास सहन कराव लागत आहे, सात ते आठ वर्षात या रस्त्याने अनेकांनी जीव गमावले असून अजून पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. वरोरा ते चिमुर ठीक ठिकाणी रस्त्याचे काम अपुरे असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कंपनीकडून बॅरिगेट लावण्यात आलेली नाही तसेच कित्तेक ठिकाणी सूचना फलक सुद्धा लाव्यात आलेले नाही. त्यामुळे अपघात होऊन कित्तेक नागरिकांना अपंगत्व आले आहे. तसेच ठीक ठिकाणी सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा पडलेल्या असून अनेकांना दुचाकी वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे..

रविवारी घडलेल्या या घटने नंतर सुद्धा के. सी. सी. कंपनीला कसल्याही प्रकारची जाग न आल्याने १० तारीख ला चिमुरला होणाऱ्या बालाजी यांचा रात घोडा यात्रेला जाणाऱ्या अन्य वाहणाला कुठला धोका होऊ नये या साठी शेवटी शेगाव पोलीस यांनी त्या मातीच्या ढिगाऱ्या भोवती ब्यारिगेटिंग करून स्वतःचे २ कर्मचारी रात्रभर तैनात केले होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!