नागपूर : जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याअंतर्गत बालभारती मैदानाजवळ गाडी चालवायला शिकणाऱ्या तरुणाची गाडी विहिरीत पडली. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. बुटीबोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. गाडीत तीन तरुण प्रवास करत होते, त्यापैकी एक गाडी चालवायला शिकत होता, तेव्हा अचानक गाडीचा वेग वाढला आणि ती नियंत्रणाबाहेर गेली आणि शेताजवळील विहिरीत पडली.







