गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षल्यांचे शिबिर पोलिसांनी उदध्वस्त केले. यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला असून, त्याला हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे.दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षल्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश आणि श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्या त्या भागात काल रवाना करण्यात आल्या.
नक्षल्यांचे शिबिर पोलिसांनी केले उदध्वस्त
चकमकीत एक जवान जखमी






