spot_img
spot_img
22.6 C
New York
Monday, June 8, 2026

भिसी येथे मंगळवारी आनंद भीमटे लिखित खुन्नस नाटकाचां प्रकाशन सोहळा


प्रतिनिधी:- भिसी

प्रा. आनंद भिमटे लिखित खुन्नस या नाटकाच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा भिसी येथील श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसीच्या रंगमंचावर दिनांक ११ फेब्रुवारी मंगळवारला रात्री ९ वाजता कलांकुर नाट्य मंडळ द्वारे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आनंद भिमटे लिखित व प्रा. डॉ. शेखर डोंगरे दिग्दर्शित “भलतच घडल वेडाच्या भरात” या नाट्यप्रयोगाच्या सादरीकरण वेळी खुन्नस नाटकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी , प्रसिद्ध साहित्यिक, विदर्भ साहित्य संघ नागपूरचे केंद्रीय सदस्य, माजी प्राचार्य, प्रा. श्याम मोहरकर राहणार असून विशेष अतिथी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. किर्ती कुमार भांगडीया यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी चिमुरचे अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे साहेब, चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश कुमार गजबे, भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र चांदे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, भिसी वन परिमंडळ अधिकारी संतोष औतकर, प्राचार्य डॉ. विठ्ठल ठावरी, प्रा. डॉ. दिनकर चौधरी, प्रा. डॉ. शरद मेश्राम व अनेक मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला व नाटकाच्या उद्घाटन सोहळ्या ला उपस्थित राहणार आहेत.

आनंद भिमटे यांनी मागील अनेक वर्षात एकूण 30 व्यावसायिक नाटक लिहिली असून त्यांच्या विविध नाटकाचे झाडिपट्टी रंगभूमी व झाडीपट्टीच्या परीघाबाहेर सुद्धा पंधराशे पेक्षा अधिक नाट्य प्रयोग झाले आहेत. सिनेस्टार मकरंद अनासपुरे यांनी आनंद भिमटे लिखित गद्दार नाटकात ‘नामदेवची ‘ मुख्य विनोदी भूमिका साकार करून विदर्भात गद्दार चे ४० पेक्षा अधिक प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्र आनंद भिमटे हे नाव चांगलेच प्रकाशझोतात आलेले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक सहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य महोत्सव अंतर्गत गद्दार या नाटका चे यशस्वी प्रयोग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नरेश गडेकर यांच्या दिग्दर्शनात सादर करण्यात आले. गद्दार नाटकात विदर्भ साहित्य संघाचे उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद भीमटे यांचे खुन्नस हे नाटक पुस्तक रूपात कलांकुर नाट्य मंडळ द्वारा ,’भलतच घडल वेडाच्या भरात ‘ या नाटकाच्या सादरीकरणावेळी प्रकाशित होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला व होणाऱ्या नाट्यप्रयोगाला परिसरातील जनतेने मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ शाखा भिसी व आयोजकांनी केले आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!