भद्रावती
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठीच्या अनुषंगाने विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक स्तरावरून स्कूल कनेक्ट 2.0 संपर्क अभियान अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती मध्ये राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. किशोर ढोक यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे विश्वस्त मा. डॉ. श्री. जयंत वानखेडे तसेच प्रा. राजेंद्र साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. डॉ जयंत वानखेडे यांनी नविन शिक्षण धोरणातील प्रामुख्याने बदललेल्या शिक्षण संरचनात्मक बदलांवर प्रकार टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती कंदीकट्टीवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. नेहा मानकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय सेवा योजना समन्वय अधिकारी प्रा. प्रमोद कृ. पाठक प्रा. डॉ. प्रशांत पाठक, प्रा. नेहा मानकर तसेच सर्व प्राध्यापक वृंद प्रा. प्रज्ञा बुरडकर, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सौ सीमा हवेलीकर, कु. पूनम काळे उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.






