सावली
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाअंतर्गत विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. विकास विद्यालयाल विहीरगाव येथील केंद्रावर दरवर्षी परीक्षा घेतली जाते. त्याकरिता ग्रामगीताचार्य सेवानिवृत्त प्राचार्य एस. एस. धारणे सर यांचे मोलाचे श्रेय आहे. यामध्ये गुरुदेव सेवा मंडळ विहीरगाव श्री नागोसे साहेब, विकास विद्यालय सौ नक्षिणे मॅडम, विकास ज्युनिअर कॉलेज डॉ. धर्मा गावंडे सर यांनी केंद्र संचालक म्हणून काम केले आणि विकास पुरलीवार सर, कु शारदा बोबाटे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम केले. यासाठी प्राचार्या कु. गराटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात हे विशेष. ग्रामगीता जीवन विकास या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी ग्रामगीतेच्या विविध अध्यायाचा अभ्यास करतात.






