spot_img
spot_img
22.6 C
New York
Monday, June 8, 2026

माधव हाके सर यांचा जिल्हास्तरावर सत्कार…

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण…

भद्रावती

ॲमेझॉन फ्युचर इंजीनियरिंग लीडरशिप फॉर इक्विटी आणि सीएसटीई चंद्रपूर व डायट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स घेण्यात आले होते. यातून शिक्षक कम्प्युटेशनल थिंकिंग, स्क्रॅच कोडींग मधील लुपींग, सिक्वेन्सिंग यासारख्या कोडींग संकल्पनाचा अभ्यासक्रमामध्ये वापर करण्यात आला. या घटकावर कोर्सची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून ७५७ शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यातून २२० शिक्षकांनी कोर्स पूर्ण केले.

यामध्ये कोर्स उत्कृष्ट रित्या पूर्ण करणाऱ्या आणि यश संपादित करणाऱ्या टॉप २० शिक्षकांना टॅबलेट व लॅपटॉप तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय श्री राजेश पातळे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर व विशाल देशमुख उपशिक्षणाधिकारी प्राथमिक , रविंद्र तामगाडगे जिल्हा समन्वयक,
एलपीजी मॅनेजर तुकाराम सर, कोड टु एनहांस लर्निंग चे मॅनेजर विशाल सर, यांच्या उपस्थितीत हॉटेल एनडीए मध्ये आयोजित कार्यक्रमात यश संपादित केलेल्या शिक्षकांना लॅपटॉप, टॅब व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात भद्रावती तालुक्यातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक श्री माधव हाके सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकेवाडा (मान) यांनी टॉप ट्वेंटी मध्ये एन्ट्री करून भद्रावती तालुक्याचे नाव व शाळेचे नाव जिल्हास्तरावर नोंदविले.

या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन भद्रातील पंचायत समितीचे बीईओ डॉ. प्रकाश महाकाळकर व केंद्रप्रमुख श्री यशवंत महाले, मराठी विषय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार तसेच सर्व शिक्षक बांधव यांनी केले. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मॅडम यांनी केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!