सुलभकांशी साधला संवाद..
चंद्रपूर
चंद्रपूर येथे सुरू असलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० या प्रशिक्षणाला आमदार एड अभिजित वंजारी यांनी प्रशिक्षण स्थळी सदिच्छा भेट दिली.
जिल्हा स्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षक २.० हे प्रशिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी हॉटेल सिद्धार्थ मध्ये आयोजित करण्यात आले. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दिनांक तीन फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारी पर्यंत चंद्रपूर येथे सुरू आहे. या प्रशिक्षणा दरम्यान काल दिनांक ६ फेब्रुवारीला नागपूर विभागाच्या पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांनी प्रशिक्षण स्थळी आकस्मिक भेट दिली.
या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत चर्चा केली व संवाद साधला. त्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सुलभक म्हणून काम करणाऱ्या मार्गदर्शकांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हास्तरावर सुलभक म्हणून मार्गदर्शन करणारे डॉ ज्ञानेश हटवार, डॉ धर्मा गावंडे, प्रा. नामदेव मोरे, माधव हाके,
विकास मोहिते, अनिल पेटकर, अविनाश जुमळे, डिंपल सावरकर, ज्योती तावाडे, नेहा सूर्यवंशी, ज्योती गावंडे, सुचरीता काळे, अश्विनी भगत, दीक्षा कांबळे यांच्याशी जिल्हास्तरीय प्रशिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतली.
यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणाचे आयोजन समन्वयक धनराज यलमुलवार यांनी आमदार साहेबांचे स्वागत केले. यावेळी डॉ ज्ञानेश हटवार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन माधव हाके यांनी केले. तसेच प्रशिक्षणातील नवीन शैक्षणिक धोरण व इतर घटकाबद्दल प्रशिक्षणार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.






