spot_img
spot_img
25 C
New York
Thursday, July 30, 2026

मराठा अकरा बटालियनचे जवान अक्षय निखुरे शहिद

वरोरा : तालुक्यातील पिंपळगाव मारोती या छोट्याशा खेड्यातील दोन्ही भाऊ भारतीय सैन्यामध्ये सेवा करतात. अक्षय निखुरे यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या वाहनांमध्ये जवळपास १८ जवान असून पाच जवान शहिद झाले. याबाबत रजेवर वर्धा या स्वगावी आलेल्या जवानांनी घरी येऊन निखुरे कुटुंबाला सदर माहिती दिली.

अक्षय दिगंबर निखुरे हे बीए फायनल ला शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या २१ व्या वर्षी सन २०१८ मध्ये रुजू झाले होते. त्याचे वडील अल्प भूधारक शेतकरी असून वडील आणि आई दोघेही घरची चार एकर शेती करतात. त्यांचे अपघाती निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज घरची परिस्थिती हलाखीची असताना आपले दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात पाठवणाऱ्या या वडिलांचे कौतुक परिसरातील जनता करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार, घरी आई-वडील आणि भारतीय सैन्य दलात असलेला एक भाऊ असा परिवार असून शहिद जवानांचे उद्याला स्वगावी शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!