spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष वरोरा अंतर्गत सक्षम महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६ डिसेंबर २०२४ ला संताजी मंदिर सभागृह शेगांव बु. येथे पार पडली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ.जोत्स्ना नन्नावरे अध्यक्ष सक्षम प्रभाग संघ शेगांव -बोर्डा प्रभाग, व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ.साधना मानकर उप सरपंच शेगांव बु, या होत्या तसेच श्याम मडावी तालुका अभियान व्यवस्थापक वरोरा, प्रकाश तुराणकर तालुका व्यवस्थापक संस्था व क्षमता बांधणी, तसेच सौं. मनीषा पुसनाके सचिव सक्षम प्रभागसंघ, सौ. राखी गिरडे कोषाध्यक्ष प्रभागसंघ, सिद्धार्थ ढोणे प्रभाग समन्वयक शेगांव -बोर्डा प्रभाग, व प्रभागातील सर्व कॅडर्स, ग्रामसंघाचे पदाधिकारी व इतर महिला यांची उपस्थिती होती.


सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक व इतर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ ढोणे प्रभाग समन्व्यक यांनी केले. प्रभाग संघाचे लेखापाल सौ. अर्चना बावणे यांनी वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेनुसार एक एक विषय वाचन करून, सर्वानुमते निर्णयाला मंजुरी घेण्यात आली. त्या नंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे सक्षम प्रभाग संघाच्या सक्षमीकरण बाबत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रभाग संघाची मागील ३ वर्षाची वाटचाल, प्रभाग संघाचे पुढील भविष्याचे नियोजन करण्यात आले. प्रभाग संघांतर्गत समूह, ग्रामसंघ व प्रभागाच्या मार्फत सुरू असलेल्या विविध उपजीविका, सामाजिक समावेशन, वित्तीय समावेशन, शासनाच्या सामाजिक योजना, आरोग्य विषयक मार्गदर्शन, वित्तीय बँकेचे सेवा इत्यादी विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन झाले. प्रभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंघ /कॅडर्स व्यक्ती यांचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. कान्हूपात्रा जीवतोडे, यांनी केले तर आभार प्रदर्शन सौं.भारती कुळमेथे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता प्रभागातील सौं. मनीषा पटेल, सौं मंगला ठेंगणे व इतर सर्व कॅडर यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!