spot_img
spot_img
25 C
New York
Thursday, July 30, 2026

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मल्लखांब क्रीडा प्रकाराचे‌ उद्घाटन..

भद्रावती

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती तालुक्यात प्रथमच मल्लखांब या क्रीडा प्रकाराचे सुरुवात करण्यात आली या क्रीडा प्रकाराचे उद्घाटक प्रा डॉ विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी प्रा डॉ कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, तान्हाजी बायस्कर व्यासपीठावर उपस्थित होते.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे प्रथमच मल्लखांब क्रीडा प्रकार सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन नुकतेच विद्यालयाच्या पटांगणात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. तानाजी बायस्कर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांनी मल्लखांब या क्रीडा प्रकाराची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. मल्लखांब या क्रीडा प्रकाराचे चित्तथरारक प्रात्यक्षिक शुभम मेश्राम, हर्षल घोटेकर यांनी करून दाखवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रमेश चव्हाण क्रीडा शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माराम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. किशोर ढोक, शेखर जुमडे, सुहास कोल्हे, पांडुरंग बोरकर, कवडू पोलेवार यांनी परीश्रम घेतले. यावेळी यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक , प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!