spot_img
spot_img
23.1 C
New York
Friday, July 31, 2026

मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा चे पहिले जिल्हा स्तरीय अधिवेशन संपन्न …

मराठी भाषिक असल्याचा अभिमान… रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी भंडारा

विद्यार्थी व शिक्षकांच्या उन्नतीसाठी संघटनेचे कार्य महत्त्वपूर्ण..
डॉ ज्ञानेश हटवार

प्रा संजय लेनगुरे यांचा पुढाकार

भंडारा

मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाऱ्याच्या वतीने एक दिवसीय मराठी विषय शिक्षकांचे अधिवेशन इंद्रलोक सभागृह भंडारा येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा यांनी “मराठी भाषा ही लोक चळवळ व्हावी, त्यासाठी मराठी विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा प्रेम निर्माण करावे” असे मार्गदर्शन केले.

मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाऱ्याच्या वतीने एक दिवसीय मराठी विषय शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन दि.,२२/१२/२०२४ ला
इंद्रलोक सभागृह भंडारा येथे संपन्न झाले . या कार्यक्रमाला अध्यक्ष अंकुश तितरमारे मार्गदर्शक भंडारा, उद्घाटक डॉ अशोक गव्हाणकर नागपूर , महासचिव व्हिजुक्टा, प्रमुख अतिथी रवींद्र सोनटक्के, शिक्षण अधिकारी, भंडारा, प्रा. रमेश खाडे, मार्गदर्शक, अमरावती, प्रा. विजया मने, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अंकुश तितरमारे यांनी “मराठी भाषेची सद्यस्थिती व विद्यार्थ्यांचा मराठी कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलण्यासाठीच आपल्याला कार्य करायचे आहे” असे सांगितले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ अशोक गव्हाणकर यांनी “मराठी विषयाची महती अभूतपूर्व असुन , बोलीभाषा जपली पाहिजे” असे स्पष्ट केले. प्रमुख अतिथी रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. भंडारा यांनी “मराठी भाषा श्रेष्ठ असून आपण मराठी भाषेबद्दलचं प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात रुजवने, ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रा रमेश खाडे सर यांनी मराठी अभ्यासक्रमाबद्दल व विषयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सत्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार तसेच प्राचार्य पदी विराजमान झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. संजय लेनगुरे कोषाध्यक्ष यांनी केले . या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र टिचकुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका बोपचे , सचिव, भंडारा जिल्हा यांनी केले.

दोन सत्रात चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमात दुसऱ्या मार्गदर्शन सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. विजय रैवतकर, गडचिरोली , प्रा. डॉ.जयश्री सातोकर भंडारा, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले गडचिरोली, डॉ विजय हेलवटे चंद्रपूर, यश पवार, यवतमाळ, पवन कटरे, गोंदिया, सुरेश नखाते, नागपूर, प्रा. नामदेव मोरे, चंद्रपूर, प्राचार्य धर्माराज काळे, गडचांदूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ ज्ञानेश हटवार यांनी ” मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा अध्यापन कार्य सरस व नाविन्यपूर्ण करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नव नवीन उपक्रमांची योजना आखावी” असे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ विजय रैवतकर यांनी “मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी, जागतिकीकरण व कौशल्य विकास याबद्दल” मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री सातोकर मॅडम यांनी “साहित्य क्षेत्रात भंडारा भूमीची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. प्राचिन साहित्यावर प्रकाश टाकला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भंडारा जिल्हा कार्यकारिणीला नियुक्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.

दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.
दुर्गेश वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निशिकांत ईश्वरकर यांनी केले. कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. विदर्भातील विविध ठिकाणावरून मराठी विषय शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व शिक्षक या एक दिवशी अधिवेशनाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. छगन झंजाळ, प्रवीण वंजारी, उत्तम बनवाडे, दिलीप करंबे, केशव कापगते,
वैशाली काळे, रेखा तितरमारे, ज्योती अवचटे,अनिल रामटेके, गीता प्रधान, नरेंद्र गायधने, शुभांगी झिंगरे, सुषमा मस्के, मनोहर सिंगनजुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!