वने व वन्यजीव जनजागृती कार्यशाळा संपन्न..
भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वने व वन्यजीव जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. “जल, जमीन व जंगल यांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे मत” अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी व्यक्त केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आयोजित वने व वन्यजीव जनजागृती कार्यशाळेत अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ श्रीकांत वरेकर अमरावती , अक्षय महल्ले , वनविभाग भद्रावतीचे शिंदे, धम्मराज नवले अध्यक्ष, संघर्ष बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व स्वच्छतेचा संदेश देणारे वैराग्यमूर्ती, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “पर्यावरणाच्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. त्या दूर करण्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे.
पाण्याचे झरे हे पृथ्वीची रक्तवाहिनी आहे” , असे मार्गदर्शन प्रा. डॉ
श्रीकांत वरेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मराज नवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिक नागपूरे यांनी केले. विद्यार्थ्यांना यावेळी प्रोजेक्टर वरती व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. रमेश चव्हाण, नरेश जांभूळकर , अशोक पीदूरकर, कवडू पोलेवार यांनी परीश्रम घेतले.






