spot_img
spot_img
24.7 C
New York
Saturday, August 1, 2026

सखी सावित्री व सुरक्षा समिती आढावा बैठक .

भद्रावती

यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वार्ड भद्रावती येथे ‘सखी सावित्री व सुरक्षा समितीची आढावा बैठक दि. 17/12/2024 रोज मंगळवारला मा.सौ. पपिया बिश्वास मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित उदघाटक तथा मार्गदर्शक कु.दिपकांता लभाने मॅडम (समुपदेशक पो.स्टेशन भद्रावती) सौ. वंदना राजु गैनवार , सौ. दुर्गा अवसरे ताई, सौ.नेहा पप्पू सिडाम तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ्बिश्वास मॅडम उपस्थित होत्या.
आढावा बैठकीचे विषय शाळेतील मुलामुलींची सुरक्षितता, आरोग्यदायी सवय व दिनचर्या , तक्रार पेटी, विद्यार्थी सुरक्षाविषयक उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.


शाळेच्या सौ.बिश्वास मॅडम यांनी सखोल माहिती दिली तसेच उपरोक्त विषयांवर सखोलपणे चर्चा करण्यात आले. व सभेत सर्वानुमते ठराव मंजुर करण्यात आले. सभेत कु.दिपकांता लभाने मॅडम यांनी महिलांना कायदाविषयक माहिती दिली व विद्यार्थांना वरिल विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. पपिया बिश्वास मॅडम यांनी केले तसेच आभार श्री. रवि मडावी सर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!