गावातील नागरिकच करतात गावासाठी दर महिन्याला स्वतःहुन पैसे गोळा
सद्या आधुनिक युगात सगळ काही मोबाईल च्या भरोशावर सुरू आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना अँड्रॉइड मोबाईल चे वेड लागलेली आहे. मित्र नातेवाईक कितीही लांब राहिले तरी या मोबाईल मुले एकत्र जोडून असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने व्हाट्सअप वर ग्रुप बनवतो. त्या ग्रुपच्या माध्यमातून दररोज गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज एकमेकांना पाठवले जातात. तसेच काही शासकीय योजनांसाठी सुद्धा आजकाल व्हाट्सअप ग्रुप बनवले जातात. याचाच आधार घेत शेगाव (बु) येथील पेशाने वकील असलेले किशोर पेटकर (नोकरी नागपूर) यांनी २०१९ मध्ये विकास ग्रुप नावाचा व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला. या ग्रुपचा उद्देश की गावातून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायासाठी बाहेर गेलेल्या तसेच गावातील तरुणांनी गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने दर महिन्याला शंभर रुपये जमा करून कुठलाही राजकीय हेतू न ठेवता जमा होणाऱ्या त्या जमापुंजीतून गावाच्या विकासाला हातभार करणे व गावात तील सामाजिक समस्या दूर करण्याचे कामे करून घेणे.
या ग्रुप मध्ये विविध पदावर सरकारी नोकरीं वर असलेले तसेच पेशाने डॉ., वकील, इजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, तसेच व्यावसायिक आहे जे गावातून शिक्षण घेऊन दुरवर नोकरी साठी किव्हा व्यवसायासाठी गेले आहे.
विकास ग्रुप हा मागील पाच वर्षापासून दर महिन्याला अविरतपणे गावातील कामे करीत आहे. गावातील रस्त्याची दुरुस्ती असो किव्हा नाल्याची साफसफाई, नाली वरील पूल असो कि कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य पुरवठा, कि ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा या सारख्या सुविधा विकास ग्रुपने गाववासी यांना दिलेल्या आहे.

नुकताच नोव्हेंबर महिन्यात विकास ग्रुप तर्फे जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे शाळेच्या आवारात स्टाईल लावण्याचे काम करण्यात आले. मागील पाच वर्षापासून विकास ग्रुप ने आज पर्यंत ७ लाख ८९ हजार ९६० रुपये जामा केले असून त्या पैकी ६ लाख ५१ हजार ९६० रुपये गावातील विकास कामावर खर्च केला आहे. कुठलाही राजकीय हेतू न ठेवता गावासाठी विकास ग्रुप हा अविरतपणे काम करत आहे
या ग्रुपच्या या सामाजिक कार्यामुळे प्रभावित होऊन अनेक लोक ज्यांचा शेगाव (बु) गावाशी काही सम्बंध नसताना सुद्धा स्वतःहून जुळेलेले आहे. तसेच या ग्रुप च्या माध्यमातून होणाऱ्या कामामुळे प्रवृत्त होऊन शेगाव च्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात दादापूर, शेगाव खुर्द, खेमजई येथे सुद्धा विकास ग्रुप त्या गावातील नागरिकांनी स्थापन केला आहे व त्यातून गावाचा विकास करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे या विकास ग्रुप ची चर्चा मात्र सर्वत्र होत असून या ग्रुप चे सदस्य दिवसोंदिवस वाढतंच चाले आहे.






