किरकोळ विक्रेते हाइवे रस्त्यावरच दुकान लावत असल्यामुळे होऊ शकते मोठा अपघात
ग्रापंचायतच चे मात्र याकडे दुर्लक्ष
दि. ११ जून
शेगाव :- स्थानिक शेगाव बु मधे दर आठवड्याच्या सोमवरला आठवडी बाजार भरत असतो. या बाजारात विविध वस्तू व भाजीपाला घेण्यासाठी गावातील तसेच आजूबाजूच्या जवळपास ५०/५५ खेड्यातील नागरिक येत असतात. याच आठवडी बाजारात काही स्थानिक दुकानदारांनी पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण केले असल्याने बाजारासाठी येणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदारांना जागेअभावी मुख्य हाइवे रस्त्यावरच आपली दुकाने लावावी लागतात. त्या मुळे दर सोमवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा हाइवे नॅशनल हाइवे असल्या कारणाने या वर मोठ्या प्रमाणात मोठे ट्रक ची वरदळ असते त्या मुळे एखादी वेळ मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आठवडी बाजारात असलेले अतिक्रमण आता फार मोठ्या प्रमाणत वाढलेले असून ग्रामपंचायत मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ग्रामपंचायत चे आजी माजी सदस्याचेस या मध्ये काही अतिक्रमण असल्यामुळे या वर कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
त्यामुळे आता या कडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन बाजारवाडीतील अतिक्रमण तसेच गावातील पण अतिक्रमण लवकरात लवकर हटवून रस्त्यावर वर लागणारी दुकाने बजारवाडीत हलवण्यात यावी व व दर आठवड्याला होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करून भविष्यात होणाऱ्या अनर्थ टाळावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.






