spot_img
spot_img
21.2 C
New York
Friday, July 31, 2026

यशवंतराव शिंदे महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी आयआयटी त पात्र

परिस्थितीवर मात करून मिळविले उत्तुंग यश

भद्रावती

नुकत्याच जाहीर झालेल्या जेइई ॲडव्हान्स परीक्षेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी आयआयटी साठी पात्र झाले आहेत. आपल्या परिस्थितीवर मात करून हे तिन्ही विद्यार्थी आयआयटी साठी झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील तीन विद्यार्थी आयआयटी साठी पात्र झाले आहेत. श्रेयश मनोज नगराळे हा अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून आयआयटी करिता पात्र झाला आहे श्रेयश चे वडील हे छोटीशी पान टपरी चालवतात व आई गृहिणी आहे . गरिबीची परिस्थिती समोर न येऊ देता नियमित सातत्यपूर्ण अभ्यासाने त्यांनी हे यश संपादन केलेले आहे. तो बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातून गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने आयआय टी परीक्षेत गुणवत्ता यादीत 2664 वे स्थान पटकाविले.

याच महाविद्यालयातील आयुष मुनेश्वर हा विद्यार्थी पंचशील नगर येथे राहतो. आयुष्य वडील हे खाजगी काम करतात व आई गृहिणी आहे. आयुषने आयआयटी परीक्षेत गुणवत्ता यादीत 3032 वा स्थान पटकाविले. तर संजना गुरचल ही डिफेन्स मध्ये आई-वडिलांसोबत राहते. संजनाचे वडील हे आयुध निर्माणीत भद्रावतीला नोकरीला आहेत . तिने आयआयटी गुणवत्ता यादी 4142 वे स्थान पटकावले आहे. बारावीच्या परीक्षेत ती महाविद्यालयातून प्रथम क्रमांक होती.

यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील या तिन्ही गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले आयआयटीत स्थान निश्चित केले. त्यांनी आपल्या यशाचे गमक अभ्यासातील सातत्य, मेहनत व आत्मविश्वास हे आहेत असे सांगितले . त्याच्या यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ विशाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ. सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, रमेश चव्हाण , आर. यू. साबळे, माधव केंद्रे व समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रवासास शुभेच्छा दिल्या . त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आईवडील यांना दीले. भद्रावती शहरात त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!