अल्पशिक्षित खासदार ठरवणार देशाचे धेय्य धोरण
.jpeg)
एडीआरच्या अहवालातील माहिती
१८ व्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले १०५ उमेदवारांचे शिक्षण इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच झाले आहे. ही संख्या निवडून आलेल्या एकूण उमेदवारांच्या १९ टक्के आहे. ४२० उमेदवार पदवीधर व पदव्युत्तर असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) जारी केलेल्या माहितीतून समोर आले आहे. १७ उमेदवार डिप्लोमाधारक असून, एका उमेदवाराचे शिक्षण पाचवीपर्यंतच झाले आहे.
शिक्षित भारतात हे अल्पशिक्षित खासदार देशाचे ध्येय धोरण ठरवणार. इथे साधा चपराशी व्हायचं असेल तर शैक्षणिक पात्रता व परीक्षा द्यावी लागते. मात्र स्वतंत्र भारतात 75 वर्षानंतरही लोकप्रतिनिधी होण्यासाठी कुठलेही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही , ही फार मोठी शोकांतिका आहे. घटनेत अनेक बदल करण्यात आले मात्र लोकप्रतिनिधी साठी शैक्षणिक पात्रताच ठरवली नाही.
उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या तपशीलातून शिक्षणासंबंधीत माहिती एडीआरकडून गोळा करण्यात आली. निवडणूक जिंकलेल्या १२१ उमेदवारांनी शिक्षित असल्याचाच उल्लेख केला आहे. विजयी दोन उमेदवारांचे पाचवीपर्यंत, तर चौघांचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले आहे. याशिवाय, ३४ दहावी पास असून, ६५ खासदारांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. बहुतांश नवनिर्वाचित खासदार शेती आणि समाजसेवेचे काम करतात. मध्यप्रदेशातील ६५ टक्के, छत्तीसगड ९१ टक्के आणि गुजरातमधील ६५ टक्के खासदारांचा व्यवसाय शेती हाच आहे. तर, ७ टक्के खासदार पेशाने वकील असून, ४ टक्के खासदारांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.
पदवीधरांचा आकडा २२ टक्क्यापर्यंत घटला
महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेल्या खासदारांचे प्रमाण वाढले आहे. विशेष असे की, पदव्युत्तर नसलेल्या खासदारांचा टक्का १७ व्या लोकसभेच्या तुलनेत १८ व्या लोकसभेत २७ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. १८ व्या लोकसभेत ५ टक्के डॉक्टर पदवी असलेल्या खासदारांपैकी ३ टक्के महिला आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८,३९० पैकी १२१ उमेदवारांनी निरक्षर असल्याचा उल्लेख निवडणूक अर्जात केला होता. ३५९ उमेदवार इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेले होते. तसेच, ६४७ उमेदवारांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. १.५०२ उमेदवार पदवीधर, तर १९८ उमेदवार डॉक्टर होते.






