डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावतीत विद्यार्थ्याद्वारे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा.
भद्रावती :
षकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक अंतर्गत स्थानिक डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण काळजी गरज असुन वाढत्या तापमानामुळे झाडे वाचविणे आपली नैतिक जबाबदारी असल्याची भूमिका यावेळी डॉ. कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांनी व्यक्त केले . महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक यांनी सुद्धा झाडे जगवून पर्यावरणातील ऑक्सीजन वाढविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. कपिल राऊत यांनी प्रत्येक विद्यार्थांनी एक तरी झाड घरी लावून वृक्ष विचविण्यासाठी प्रयत्न करावे असा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतला, तसेच आजच्या दिवसापासून दहा तारखेपर्यंत महाविद्यालयामध्ये पाणी वाचवणे मानवी जीवन वाचवणे या आधारावर अनेक कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस द्वारे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ. प्रशांत पाठक, प्रा. प्रज्ञा लांडे, प्रा. प्रीती कंदकट्टीवार, प्रा. नेहा मानकर, प्रा.डॉ. सुधीर मोते , प्रा. रमेश चव्हाण, प्रा. किशोर ढोक सर, श्री. पिदूरकर सर, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर सीमा हवेलीकर, निर्मिती रामटेके हे उपस्थित असून प्रत्येकानी झाडे वाचविण्याचा संकल्प केला व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी पार पडला .






