spot_img
spot_img
22.6 C
New York
Tuesday, August 4, 2026

सिवली बुद्ध विहार भद्रावती येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी

भद्रावती, दि. 17 : चक्रवती सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त सिवली बुद्ध विहार, दरबान सोसायटी, भद्रावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणुन जेष्ठ साहित्यिक पांडुरंग डी. कांबळे, प्रमुख वक्ता समता सैनिक दल केंद्रिय कार्यकारिणी सदस्य मार्शल अविनाश दिग्विजय आणि मार्शल गणेश शिरुर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरवात चक्रवर्ती अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपप्रज्वलन करुन सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सम्राट अशोक यांच्या जीवनावर विस्तृत अशी माहिती उपस्थित जनतेला देण्यात आली आणि सम्राट अशोक यांची जयंती साजरी करणे त्यांचे मानवतेसाठी असलेले मोल्यवान योगदान जनतेला सांगणे आजच्या तारखेला किती महत्वाचे आहे हे सांगितले. सम्राट अशोका कडे देशाने, समाजाने दुर्लक्षीत करु नये असे सांगीतले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सिवली बुद्ध विहार सदस्य, मालाताई चिकाटे, सुलोचना चिंवडे, चंद्रकला वालदे, प्रज्ञा उके, सुमित्रा पेटकर, बिंदु रामटेके, मिना उराडे, निर्मला कुमार, उज्वला कांबळे, फुलचंद अवथरे, अरुण बुरनूरे, अल्पास रामटेके, विजय पेटकर, पार्वता जुनघरे वामन चिवंडे, मनिष गावंडे, मार्शल कमलाकर काटकर, मार्शल मणिकुमार जाधव, अशोक पाझारे, अमोल दवाडे, हर्षल रामटेके इत्यादी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत चिकाटे आणि आभार प्रदर्शन मनिष गावंडे यांनी केली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!